महागाईचा दर हा प्रत्येकासाठी वेगवेगळा असू शकतो. कारण प्रत्येक व्यक्तीच्या गरजा, वस्तू - सेवांचा वापर वेगवेगळा असतो. भारताचं सांख्यिकी मंत्रालय दर महिन्याला कंझ्युमर प्राईस इंडेक्स (CPI) म्हणजे ग्राहक मूल्य निर्देशांक जाहीर करतं. हा दर संपूर्ण देशातली सरासरी महागाई दाखवतो.
आम्ही तयार केलेला हा कॅलक्युलेटर तुमचा अन्न, कपडे, निवास यासारख्या विविध गोष्टींवर किती खर्च होते हे सांगायला मदत करेल. आणि तुमच्यासाठी वस्तूंच्या किंमती किती वाढल्या आहेत, महागाईचा दर किती आहे, हे देखील सांगेल.
कल्पना करा, की या महिन्यात तुमच्याकडे खर्चासाठी हजार रुपये आहेत. मग तुम्ही यातले किती पैसे, कशावर खर्च करायचे हे कसं ठरवणार?
स्लायडर वापरा किंवा टाईप करा
आतापर्यंतच्या खर्चांच्या प्रकारांवरून तुमच्यासाठीचा महागाईचा दर आहे :
{number} भारताच्या सरासरी महागाई दरासोबतची तफावत
तुमच्या मासिक खर्चात इतकी वाढ होण्याचा अंदाज आहे
कॅलक्युलेटरने ग्राहक मूल्य निर्देशांकाची (कंझ्युमर प्राईस इंडेक्स) डिसेंबर 2022ची आकडेवारी वापरली. यामध्ये सर्व वस्तूंचा वेगवेगळा महागाईचा दर आहे.
जेव्हा तुम्हा एका विशिष्ट गोष्टीवरचा खर्च कमी करता, तेव्हा कॅलक्युलेटर त्यानुसार त्या कॅटेगरीमध्ये बदल करतो आणि इतर सामान्य भारतीयांच्या तुलनेत तुम्ही किती जास्त वा कमी खर्च करता त्यानुसार तुमच्यासाठीच्या महागाईच्या दरात बदल घडतो.
शब्द आणि निर्मिती - शादाब नज्मी डिझाईन आणि इलस्ट्रेशन - लोकेश शर्मा डेटा अॅनालिसिस - तजीन पठाण इलस्ट्रेशन - पुनीत बर्नाला डेव्हलपमेंट - मॅथ्यू टेलर, मार्कोस गुर्गेल, कावेरी बिस्वास आणि जेरीना जेकब.